ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

राज्यभरातील ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील 12 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष असलेला भाजपलाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज जसेजसे निकाल हाती येत आहेत, तसं शिवसेनेच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पहिला भगवा फडकल्याचं दिसून आलं.(Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results)

हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीचे 13 पैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तिकडे राधानगरी मतदारसंघातील बारवे गावात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. बारवे गावात आबिटकर गटाने 9 पैकी 6 जागा जिंकत विजय मिळवला आहे.

हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडीत भाजपला जोरदार धक्का देत शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. बिरदेववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. हा विजय मिळवून शिवसेनेनं भाजपची 40 वर्षाची परंपरा खंडीत केली आहे. तिकडे सोलापूरमधील नांदणी ग्रामपंचायतीवरही शिवसेनेचा विजय झाला आहे. एकूण 9 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवत शिवसेननं सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला 3 जागा मिळवण्यात यश आलं आहे.

कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेंना धक्का

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 5 ग्रामपंचायती शिवसेनं खेचून आणल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे आणि देऊर या राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती शिवसेनेनं खेचून आणल्या आहेत.

पाटण तालुक्यात शिवसेनेचा सर्वात मोठा विजय

शिवसेनेला सर्वात मोठा विजय सातारा जिल्ह्यात मिळताना पाहायला मिळत आहे. कारण सातऱ्यातील पाटण तालुक्यात आतापर्यंत 18 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारल्याची पाहायला मिळत आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील नागरिकांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा झटका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या मूळ गावात शिवसेनेनं पाटलांना मोठा झटका दिला आहे. खानापूर गावातील 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा इथं विजय झाला आहे.The results of Gram Panchayats across the state are coming. It shows that the ruling Shiv Sena is on a winning streak.

Mumbai: Results of more than 12 thousand gram panchayats in the state are coming. It shows that the ruling Shiv Sena is on a winning streak. After that, the opposition BJP is also winning in many gram panchayats. As the results are coming out today, the number of Gram Panchayats under the control of Shiv Sena is increasing. After the counting of votes started today, it was seen that Shiv Sena’s first saffron fell on Minche Gram Panchayat in Hatkanangale constituency. (Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results)

In Hatkanangale constituency, 10 out of 13 candidates of Shiv Sena-led Pravin Yadav Yuva Shakti Aghadi have won the Minche Gram Panchayat. As soon as the results were announced, Shiv Sena workers chanted slogans. Shiv Sena MLA Prakash Abitkar’s group has come to power in Barve village in Radhanagari constituency. In Barve village, Abitkar group has won 6 out of 9 seats.

In Birdevwadi of Hatkanangle taluka, it is seen that Shiv Sena has hit hard by pushing BJP. Shiv Sena has won 6 out of 7 seats in Birdevwadi Gram Panchayat elections. With this victory, Shiv Sena has broken the 40-year tradition of BJP. Shiv Sena has also won over Nandani Gram Panchayat in Solapur. Shiv Sena has won 6 out of 9 seats. The Congress has managed to get 3 seats.

Push to Shashikant Shinde in Koregaon taluka
In Koregaon taluka of Satara district, Shiv Sena has given a big push to NCP, which is an ally of Mahavikas Aghadi. In Koregaon taluka, Shiv Sena has pulled out 5 gram panchayats under the control of NCP. Therefore, NCP MLA Shashikant Shinde has been shocked. Shiv Sena has taken over the gram panchayats of Mangalapur, Kinhai Peth, Katapur, Lhasurne and Deor.

Shiv Sena’s biggest victory in Patan taluka
Shiv Sena is getting its biggest victory in Satara district. Because in Patan taluka of Satara, the result of 18 gram panchayats has been achieved so far. Out of them, Shiv Sena has gained power in 13 gram panchayats. NCP has won 8 Gram Panchayats. Therefore, in Patan taluka, Shiv Sena leader and Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai has won. This victory is the faith of the people in the leadership of Chief Minister Uddhav Thackeray, said Shambhuraj Desai.

Shiv Sena’s blow to Chandrakant Patil
Shiv Sena has given a big blow to BJP state president Chandrakant Patil’s native village Khanapur. Shiv Sena candidates have won 6 seats in Khanapur village. Chandrakant Patil had made this election a matter of prestige. But MLA Prakash Abitkar’s group has won here.

Leave a Comment

%d bloggers like this: